वचन
वचन
1 min
167
काय म्हणतोस? वचन देतोस?
नाही रे अपेक्षा त्याची...
देणं घेणं वाटते मला,
भाषा व्यवहाराची....
माझ्यासाठी फक्त इतकंच कर,
समजून घे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..
चुकत माकत बसले तर,
येऊन तू मला आवर..
गेलाच तोल धडपडतांना
लगेच तू मला सावर...
वचनांचं काय?
दिलेली वचनं कधी कधी तुटून जातात..
कालौघात त्यांचे संदर्भ सुटून जातात...
