वचन
वचन
1 min
215
वचन देतो तुला
साथ देईन मी
तुझ्या सुख दुःखात
सोबत असेन मी
वचन देतो तुला
खोटे बोलणार नाही
वाईट मार्गाच्या वाटेवर
कधीच चालणार नाही
वचन देतो तुला
कधीही रडवणार नाही
डोळ्यात अश्रू येतील
कृत्य असे करणार नाही
वचन देतो तुला
प्रतारणा करणार नाही
मनाला ठेच लागेल
असे वागणार नाही
