वचन आज तू घेच...!
वचन आज तू घेच...!
1 min
229
वचन आज उद्याच्या भविष्याचे
जाणीव दुसऱ्यांच्या इच्छांची
बीज मनोमनी आहे आदराचे
मान उंचावेल सर्वांच्या सदिच्छांची
दोषाचा एक घोट अपशब्द
दुरावतो हर एक माणसामाणसाला
निर्मळ मन करुनि स्वागत हास्याने
जाण वचनाची पुन्हा आपल्याला
सन्मान स्वइच्छांचा राख जपून
जात पात वाळीत टाकून घेच
हक्कांसोबत कर्तव्याची रे साधना
परोपकाराचे वचन आज तू घेच...!
