वाट
वाट
जाता येता पाऊल पडता पडता पाऊल वाट त्याची व्हायची|
जाता येता पाऊल पडता पडता सगर त्याची व्हायची |
जाता येता सगर पडता पडता पाऊल वाट त्याची कधी व्हायची I
जाता येता पाऊल पडता पडता वही वाट त्याची व्हायची
वहीवाट पडता पडता रहदारी त्याची व्हायची I
जाता येता रहदारी पडता पडता रस्ता त्याचा व्हायचा ।
जाता येता रस्ता पडता पडता हमरसा त्याचा व्हायचा |
जाता येता हमरस्ता पडता पडता महामार्ग त्याचा व्हायचा |
जाता येता महामार्ग पडता पडता चार पदरी त्याचा व्हायचा !
जाता येता चार पदरी पडता पडता
विस्तार त्याचा व्हायचाI
जाता येता विस्तार पडता पडता विकास त्याचा व्हायचा ।
जाता येता विकास पडता पडता आजूबाजूंचा तो भकास करायचा |
जाता येता भकास पडता पडता अनेकांचे जीवन तो संपवायचा I
जाता येता पाऊल पडता पडता इतरांसाठी तो समृध्दी महामार्ग तो व्हायचा |
जाता येता पाऊल पडता पडता समृध्दीचे गाणे तो गायचा गाणे तो गायचा |
