वाट जीवनाची
वाट जीवनाची
1 min
194
ही वाट एकटी जीवनाची
चालतात वेगाने सारे ही
ही वाट नेतसे पोटाकडे
मंत्रमुग्ध कामात सारे ही
मूक करविते
हे रोज कामास मुंग्यांसम
गुंतवून घेतात सारे जे
हे होते वारूळे रिकामीच
सांजवेळी पहाटे कधी जे
पोटासाठी धाव
तो असा लढतो पोटासाठी
प्रत्येकास ठाऊक आहे रे
तो सारी स्वप्नेही कवटाळे
सहजच हृदयास असा रे
स्वप्ने अपूर्ण
तो असा झटतो जगण्याची
नयनात घेवून आस जी
तो अशी भुकेली निजलेली
पोरसोरं पाहून स्तब्ध जी
संपते आस
