वात्सल्य
वात्सल्य
1 min
294
राणी राणी म्हणत
भ्रमराच्या गुंजना सारखे
गुंजतात सारे,
शक्य नसलेली
वचने ही
देतातच सारे,
फक्त एका लोभापायी......१
तू दासी आहे
असे हिणवून
तुच्छतात ही सारे,
रात्रंदिवस दमून
कामे सगळी
करून घेतातच सारे,
फक्त एका स्वार्थापायी.......२
आयुष्यात स्त्रीला
महत्त्व नाही
हे पटवतात सारे,
स्त्रीने आवाज
उठवला तरी
दचकतात ही सारे,
फक्त एका हक्का पायी.......३
शेवटी तू आमची
जननी आहे
असे म्हणतात सारे,
तू आमची सगळ्यांची
कैवारी आहे म्हणून
भीक मागतात ही सारे,
फक्त एका मिळालेल्या आयुष्यापायी....४
तू ही क्षमा करतेस
फक्त तुझ्या वात्सल्यापायी
