वात्रट प्रिय (वात्राटिका)
वात्रट प्रिय (वात्राटिका)
1 min
578
स्वयंपाकघरात डोकवायला तरी
गृहिणींना हल्ली कुठे आहे वेळ?|
यु ट्युबवर शोधून होतेय दमछाक
चमचमीत कशी बनवावी भेळ?||
हात कामात झाले जरी काळे
तरी मनी तो सफेदच कमावतो|
तो शंभरदा हात धुवूनही सतत
काळ्या पैशापायी नाव गमावतो||
सत्तेपुढे म्हणे राजकारणात
शहाणपण ते टिकतच नाही |
विकलं जातं म्हणे तिथं तेच
जिथं ते मुळी पिकतच नाही||
