वास्तव...
वास्तव...
1 min
254
स्त्री मनास माझ्या किती धागे
कधी उलगडले कधी कुरतडले
चिरले कधी नकोशा आसवांनी
कधी शब्दाच्या कडव्या धारांनी
विस्कटलेल्या खेळाला ठिगळे
हरण्याला कितीदा कुरवाळले
वास्तवाची भाषा जगण्याची
कुणा कळेल का मरण्याची
आता मुक्ततेचा रंगेल का डाव
स्त्रीला स्वातंत्र्याची मिळेल का
वास्तविक हक्काची शान...
