STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

वारकरी

वारकरी

1 min
90

रूपाया एवढ कुंकू कपाळी

 डोईवरती तुळस ग

 हसतमुखाने उभी देवाच्या दारी

 माऊली तुला नाही आळस ग


लाल लाल लुगड नेसून नटली

जशी रखुमाई दारात 

हसत मुखाने पुसते ईटूला

येऊ का तुझ्या राऊळात


 हातामध्ये हिरव्या बांगड्या

   सवासणी च लेण ग

झेलून पाऊस अंगावर ती 

  वारी ला ते येण ग


गळ्यात डोरल मोत्याची माळ

 कुंकवाने भरलेलं कपाळ

 चालुन चालुन थकले ईटोबा

 ठेवू दे तुझ्या चरणी भाळ


लई मागण न्हाई देवा

 पोटापुरते पिकाव

 धन्याला यंदा जमलं नाही

 भोळा भाबडं मानून घ्यावं


Rate this content
Log in