STORYMIRROR

Kanchan Thorat

Others

3  

Kanchan Thorat

Others

वाकडी वाट ...

वाकडी वाट ...

1 min
188

वाकड्या तिकड्या वाटेने , चालणं ,

 मला कधी आवडलं नाही . 

पण , तू मात्र सरळ कधी ; 

चाललाच नाहीस . 

साधं विचारलं तरी , 

तू आपला वाकड्यातच शिरणार .... !

 तुझ्या सोबत फरफटताना , 

बघ ना ! किती सवयीचं झालंय .. 

ना एखादी जखम होत आता , 

ना फरफटण्याची भीती राहिली . 

खंत एवढीच , 

वाकड्या तिकड्या वाटेनं चालणं ,

 मलाही आता जमाय लागलंय !


Rate this content
Log in