STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

वाजले की बारा....!

वाजले की बारा....!

1 min
433

वाजलेकी बारा.....!

अकरा ....!!

अकरा म्हंटल की

तुझं नाव बकरा आठवतं

नाहीतर भूतकाळात

आता मार चकरा शिवाय दुसरं

कुठं काय आठवतं...!


आकडा असा की

धाव पळ करायला लावतो

नोकरी वाल्यांची

क्षणात झोप उडवतो....!


सुट्टीत सुद्धा

हा पाठ कधी सोडत नाही

अकरा वाजले

उठा आता हंतरुण आवरा

ऐकवल्या शिवाय रहावत नाही....!


पण आता

एकावर एक अकरा

बरं वाटत ऐकायला

बाल पण सार साठवलेलं

आठवत अकरा ऐकताना....!


आता घड्याळ पाहिलं

की वाजलेकी बारा

हे सेकंद काठाचं सांगतो

लाल रंग काट्याचा वैताग आणतो....!


या पलीकडे जाऊन

म्हणून तर बंद पडलेलं

घड्याळ मी भंगारात टाकलंय

आता बाबा नवीन

चालू घड्याळच हातात बांधलंय...!


माझ्या घड्याळात

तास काटा मिनिटं काटा नाही

सेकंद काट्याला मी

कधीच सोडत नाही

कारण

प्रत्येक क्षणच माझं जीवन घडवतो...!


अंगातली आळसाची ऐट

सारी झटकून टाकले

आकाराच्या ठोक्याला राम राम केलाय

कारण प्रत्येक क्षणो क्षणी

कामात व्यस्त राहण्याची शपथ घेतलीय..!


बर वाटत रोज

देशाच्या उन्नतीसाठी काम करताना

हातात श्रमाचे मोल

खणखणीत वाजवून घेताना

देशासाठी प्रत्येक क्षण सत्कारणी लागताना....!


Rate this content
Log in