STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

4  

Prachi Kulkarni

Others

वाहते डोह

वाहते डोह

1 min
288

सैरभैर दिशांनी मागता किनारा

कसे आवरावे मना, मज कळेना,

उधाणलेले, उधळलेले पाचोळ्यांचे ढीग जरी

पेटून उठतील देठापासून, पडली ठिणगी तरी

रितेपणाला पूर्णत्वाने भरुनी आता

अपूर्णाचा शाप ..माझ्या माथा

स्फुल्लिंगाचे झरे जणू , माझ्यातून जन्मतात

जुने डोह पाणावलेले, आता वाहते होतात..


Rate this content
Log in