STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

वाघ्या मुरळी

वाघ्या मुरळी

1 min
317

पोर होईना पोटी म्हणुनी

नवस केला देवाला

पहिलं मूल नवसाचं मी

वाहीन तुझ्या पायाला।। १।।


मूलगा झाला पहिला तो

देवाचा मग वाघ्या झाला

मुलगी झाली नवसाने

ती देवाची मुरळी झाली।। २।।


वाघ्या मुरळी जोडी ही

भक्त खंडेरायाची

जागरण करुनी गावोगावी

महती सांगती जेजुरीची।। ३।।


वाहिले आयुष्य सारे

देवाच्या भक्तीला

वाघ्या मुरळी जोडी ही

शोभा आणी जागरणाला।। ४।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन