वादळं...
वादळं...
1 min
159
वादळं आयुष्यात
नेहमीच येतात,
वादळं माणसाला
काहीतरी शिकवतात...
वादळं येतात
अचानक तात्कालिक,
काेलमडून टाकतात
मनामनातलं पीक...
वादळवाऱ्यांना घाबरून
साेडायची नसते वाट,
ही तर सत्व परीक्षेची
असते अनामिक लाट...
वादळं पचवून
काढायचा मध्यम मार्ग,
वेळोवेळी निचरा
करायचा हा विसर्ग...
