वादळासारखं वागणं तुझं...
वादळासारखं वागणं तुझं...
सखे सखे पळून निघालेले जीवन माझं
अजूनही पूर्ण जवळ नाही
वादळा सारख वागणं तुझं
कधीच मला कळलं नाही......
नको बोलूस माझ्याशी आता मला तुझ्याशी बोलायचं नाही ,आभाळा एवढे दुःख माझं खरच तुला बोलायचं नाही.
खूप खूप वेळा झटलो पण गणित प्रेमाचं जुळलं नाही, वादळासारखा वागणं तुझं ,कधीच मला कळलं नाही.
फिरलो फिरलो मी आणि फिरवल्यास तू हरलो मी पण हरवलं असतो वेळेत तुझ्याच फांद्या तोडताना काय पण मिळवलंस तू.....?
अंकुर अंकुर प्रेमाचा करपून गेला,खुरट झाड फळल नाही, वादळा सारख वागणं तुझं कधीच मला कळलं नाही......
माझी पाऊले एकटीच जातात अन नदीच्या किनारी गाणी गातात, धुंद ती गीते तुझ्या सोबतीची विरहाची आज तराणी होतात.....
किती दिवस आले-गेले, ओठात गाणं फुलंल नाही, वादळासारख वागणं तुझं कधीच मला कळलं नाही.....
