वाचनालय
वाचनालय
वाचनालयाची माझे
एक वेगळेच नाते होते
पुस्तक व माझ्या मैत्रीचे बंद
त्याच्या साक्षीने बहरले होते.
ती ओळीत ठेवलेली पुस्तके
जणू अमूल्य खजिना
खुणावतात ती सारी
आस्वाद आमचा घ्याना.
कथा कादंबरी कविता
काय सांगू त्यांची विविधता
काळजा घातली हात वाचकांच्या
हीच त्यांची महानता.
बालकवी, माडगूळकर खांडेकर
सारे एकत्र आले
वाचनालयाचे मग
साहित्याचे गोकुळ झाले.
मंदिराची पवित्रता अन शांतता
वाचनालयाला आली
वाचनालय मंदिर अन
पुस्तके देव झाली.
असाच मंदिरी
मी रोज जाते
पुस्तकांच्या देवाची
पूजा मी करते.
देवाने दिलेल्या वरानेच
मी आज लिहित आहे
जमेल तशी साहित्याची
सेवा करीत आहे.