"उटी"
"उटी"
नागमोडी प्रवास माझा
दिसे उंच टेकडी एकटी
थंड हवेचे ठिकाण ते
नीलगिरित सजली "उटी"
"युटर्न" पहिल्यांदा अनुभवली
"हेअरपिन" च्या आकाराची
दरीत डोकावून पाहीलो तेव्हा
धडकन वाढली हृदयाची
कडाक्याची थंडी होती
24अंश सेल्सिअस होता पारा
सोणपिवळ्या उन्हातही
अंगाला स्पर्शतो थंड गार वारा
हिरव्या शालीत , उतारावर
बोलके ते चहाचे मळे
सातजन्माची भेट जणू
पाणावले दोन्ही डोळे
रंगीबेरंगी गुलाब पुष्पानी
सजला होता "रोझगार्डन"
वाटे रोज इथेच राहावे
होऊनी सर्व फुलांचे "वॉर्डन"
निळ्या निळ्या पाण्यात केली
मस्त मस्त "बोटिंग"
तोल गेला पाण्यात तेव्हा
"यम" ही उद्गारला "नंबर" तुझा "वेटिग"
धुक्यात हरवली होती
मखमली "डोडाबेटा"चोटी
स्मरणात नित्य राहिली
माझ्या प्रवासातील "उटी"
