STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Others

3  

manisha sunilrao deshmukh

Others

उठ मराठे हरत नसतात....

उठ मराठे हरत नसतात....

1 min
164

जेव्हा वाटेल हरतो की काय??

तेव्हा....

गगनाला भेदून जाणारी

 ती नजर आठव....


दाही दिशांनी घुमलेली.

विजयी ललकारी आठव....


आठव तो शून्य...

आठव ते तारुण्य....

आठव ते स्वराज्य...


उठ || मराहहाठे हरत नसतात...


आठव त्या निधड्या छातीला..

घे अंगावर महद आव्हानांना

धार लाव तू वाघनखाना..


पेटून उठू दे..

शक्ती अंतरीची..

दिसू दे जगास..

ताकद शिवबाच्या मावळ्यांची......


Rate this content
Log in