उषा जन्मली
उषा जन्मली
पुन्हा एकदा जन्मली उषा
काळ्याकुट्ट रात्रीच्या गर्भातून
पुन्हा एकदा जन्मली किरणे
तेजोमय रवीच्या गर्भातून
लेवून आली पहाट हिरवा शालू
भरजरी रवीकिरणांनी सजली
पहाट दवबिंदू लागली माळू
बेधुंद वाट उषेच्या प्रितीत भिजली
श्रुंगार पाहूनी असा उषेचा
वेडी सकाळ खुदकन हसली
नव दिवस उगवला आशेचा
नवी स्वप्ने मनी सजू लागली
चैतन्याचा झरा वाहू लागला
पहाट स्वप्ने लागली सजवू
