उन्हातला संसार...
उन्हातला संसार...

1 min

11.6K
अग्नीचा उठतो दाह
सोसतो भुकेची कळा
गरिबीच्या संसारात
कष्टाने फुलतो मळा
उन्हाचे चटके सोसून
राबे माय बाप शेतात
लेकरांच्या तेव्हा कुठे
चटणी भाकर पोटात
मोकळीक देई लेकरांस
घेण्यास मोकळा श्वास
होईल कष्टाचं रे चीज
काळजावर ठेवी विश्वास
शिकून आता नोकरीस
तरी हालत होई बेकार
माय बापास देई ठोकर
नको अशी उपासमार
शेवटी उन्हातला संसार
राहतो स्वार्थात अपूर्ण
सुकेल का विवेकाने
चटक्यांचा घाम पूर्ण