STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

उन्हातला संसार...

उन्हातला संसार...

1 min
426

अग्नीचा उठतो दाह 

सोसतो भुकेची कळा

गरिबीच्या संसारात 

कष्टाने फुलतो मळा 


उन्हाचे चटके सोसून 

राबे माय बाप शेतात 

लेकरांच्या तेव्हा कुठे 

चटणी भाकर पोटात 


मोकळीक देई लेकरांस

घेण्यास मोकळा श्वास 

होईल कष्टाचं रे चीज 

काळजावर ठेवी विश्वास 


शिकून आता नोकरीस 

तरी हालत होई बेकार 

माय बापास देई ठोकर 

नको अशी उपासमार 


उपेक्षिले जन्मदात्यास 

तरी प्रेमास राही बाद्ध 

अजूनही ते प्रतीक्षेत 

नाही घातले रे श्राद्ध 


शेवटी उन्हातला संसार 

राहतो स्वार्थात अपूर्ण 

सुकेल का विवेकाने 

चटक्यांचा घाम पूर्ण 


Rate this content
Log in