उन्हाळ्याची दाहकता
उन्हाळ्याची दाहकता
1 min
238
माणसाला काहीच सहन होत नाही
पावसाळ्यात पाऊस सहन होत नाही
हिवाळ्यात थंडी सहन होत नाही
उन्हाळ्यात गरमी सहन होत नाही
प्रत्येक काळ आपल्या परीने येतो
त्याचे जे काम आहे तो करून जातो
पाऊस, थंडी नि गरमी गरजेचे आहे
त्याशिवाय निसर्गाचे ऋतुचक्र अपूर्ण आहे
उन्हाळ्याची दाहकता वेगळीच असते
पाण्याची चणचण नि उष्ण हवामान
लोकांची अशा वेळी होते खूप परवड
दुपारच्या वेळी वाढत राहते तापमान
उष्माघात होऊ नये याची काळजी घ्यावी
तासातासाला घोट घोट पाणी पीत राहावे
उन्हातान्हात फिरणे नि काम करणे टाळावे
जमेल तेवढा वेळ घरातच विश्रांती करावे
