उज्ज्वल भविष्य
उज्ज्वल भविष्य
1 min
1.4K
घेई कन्या जन्म ।का निराशे मन
परक्याचे धन ।म्हणे तिला ।
नाजूक कलिका ।तिला खुडू नका
घात करु नका ।भावनांचा ।
द्या मान सन्मान ।जपा ही पणती
ममतेची नाती ।अखंडित ।
कास शिक्षणाची ।गती जीवनाला
तिच्या भविष्याला।सदोदित ।
माणूस म्हणूनी।तिला ही जगू द्या
तेज झळाळू द्या।दाहिदिशी ।
घडवा कन्येचे।उज्ज्वल भविष्य
सोनेरी आयुष्य ।अद्वितीय ।
आकाशी घेईल ।उत्तुंग भरारी
ही आजची नारी ।चराचरी ।