उद्याची आशा
उद्याची आशा
1 min
196
माणूस स्वप्नांवरच जगतो
डोळ्यासमोर ध्येय ठेवून चालतो
कधी अडखळतो कधी पडतो
स्वप्न पूर्ण करण्या धडपडतो
प्रत्येकाच्या मनात नेहमीच असते
उद्याच्या जीवनावरची एक आशा
उद्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
सदा शोधीत असतो तो दाहीदिशा
मनात कसलीही निराशा न आणता
मार्गावर अखंडित चालले पाहिजे
पदोपदी मिळतात अनेक अपयश
त्याला पचवून यश मिळविले पाहिजे
मनात कुठलीच आशा नसेल तर
असे निराशावादी जीवन व्यर्थ आहे
आशा पूर्ण करण्या प्रयत्न करणे
त्याच जीवनाला खरा अर्थ आहे
