उच्चनीचतेचे मर्म...
उच्चनीचतेचे मर्म...
1 min
189
जिथे पहावे तिथे आज
अस्मितांचे प्रश्न आहे
जन्म आपला एकच असुनही
नावाचे राजकारण आहे...
हा माझा हा परका
हा भेदभाव मनी कोरला आहे
कोणाचे हरणे झाले कोणाचे जिंकणे
सूड डोक्यात पेरला आहे...
द्वेषाने पेटलेल्या मनाला कधी कळेल
पाण्याला कधी नसतो धर्म
सारे धर्म बंधुभाव शिकवतात
त्यात नसते उच्चनीचतेचे मर्म...
