STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

4  

Nilesh Jadhav

Others

उभा कवितेच्या दारी

उभा कवितेच्या दारी

1 min
385

दुनियेचं काय घेऊन बसलात राव,

मायाजाल ही दुनिया सारी

खोट्या मुखवट्याची माणसं, 

काही असतीलही खरी


सवडीनेच जगावं लागतं इथे प्रत्येकाला,

इच्छा असूनही परी

हरवतात सोबती, 

सोबत असूनही कोठेतरी


सुख-दुःखाची बेरीज वजाबाकी,

प्रत्येक घरोघरी

भावनाशून्य प्रेमाची

होतेच की मारामारी


काय करू, कोठे जाऊ? 

शब्दांची संगत बरी

व्यक्त करण्या स्वतःला मी,

ऊभा कवितेच्या दारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन