STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

त्या जुन्या वाटा

त्या जुन्या वाटा

1 min
217

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात आनंदाच्या लाटा

अनेक बंधने, जगताना अनेक आठकाठी

हे करू नको ते करू नकोची आडवी काठी

खेळतच राहत असे पायी रुतला जरी काटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

शाळेला दांडी मारून मित्रांसंगे पोहायला जाणे

घरात लबाड बोलून आवडता सिनेमा बघणे

खिशात त्यावेळी नव्हते जरी रुपयांच्या नोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

ती मलाच पाही म्हणून तिचे नाव वहीत लिहलं

चोरी चोरी चुपके चुपके तिला भेटावंसं वाटलं

माझं प्रेम तिला वाटत असेल जरी खोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

लहानपणीच्या आठवणीने आता येते हसू

दुःखात मित्रांना पाहून डोळ्यात येती आसू

मदत करावी गरीबांना झाला किती जरी घाटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा


Rate this content
Log in