त्या झाडाखाली
त्या झाडाखाली
1 min
11.4K
मी आजही वाट पाहत उभा आहे
त्या झाडाखाली
जिथे रंगवली होती स्वप्न
तुझ्या माझ्या सुखी संसाराची....
झाडाने खूप समजावलं मला
एखाद्या अनुभवी व्यक्तीसारख
तू परत येणार नाही म्हणून...
पण मी मात्र हट्टालाच पेटलोय
तू येणार ....
काल-परवाच त्याने मला
प्रश्न केला
तुझं प्रेम आहे 'खरं'
पण तिचं?...
मी अनुत्तरीत झालो
पण शंकीत मात्र नाही.
मी वाट बघत होतो...
बघत आहे...
बघणार आहे...
शेवटच्या श्वासापर्यंत.
