तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
1 min
187
ममतेच्या सावलीत वाढून
घेऊन शिकवण, देई स्वतःस आकार,
घडव स्वतःला तू तुझे
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
ममतेच्या सावलीत वाढुन
घेई धडे जीवन अनुभवाचे,
संघर्षाच्या खाच खळग्यातुन
पुढे पुढे चालत जाण्याचे.
यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यास
घडवे स्वतःस कष्टाने,
ममतेच्या छत्रछायेत राहून
करे स्वतःस तयार धैर्याने.
