STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

तूच राजा

तूच राजा

1 min
211

मी अशीच शून्य होते 

     जेंव्हा तू स्मरणात येतो 

हर्षाने मन धुंद होवुनी 

     वेड जीवाला तुझे लाविते 

तू जाशील त्या वाटेवरती 

    तेथे कुसूमांचा वर्षाव करावा 

ना लोप पावावा, मंत्र मुग्ध तो नजारा 

    तुझ्या मधुर वाणीमधे 

वेगळीच जादु आहे...

    न बोलताही सर्वच बोलतात 

बेभान तुझे ते लोचन आहे 

    तेजस्वी तुझा चेहरा बघुनी 

कोमजलेली फुले ही फुलून जातील 

     ते रुप तुझे पाहुन 

चंद्रमाही लाजरा होईल 

    हो तू तोच आहेस 

मन मोहना... प्रीत सजना... 

या हृदयाचा एकटा तूच राजा...


Rate this content
Log in