STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

3  

Suvarna Patukale

Others

तूच पंख दिले मला

तूच पंख दिले मला

1 min
260

तूच पंख दिले मला

तूच दाविले आकाश

दिला चोचीतून चारा

अणि जीवनी प्रकाश

तूच पंख दिले मला....

तूच हात दिला मला

तूच दिलासी आधार

आत्मविश्वासाच्या ज्योती

जाई लोपूनी अंधार

तूच पंख दिले मला.......

तूच वाट दिली मला

तूच दावीला प्रवास

चालताना सोबतीला

तूच दिला एक ध्यास

तूच पंख दिले मला.......

तूच आस दिली मला

तूच लावली ही माया

अणि पोळल्या जिवाला

दिली शीतल तू छाया

तूच पंख दिले मला..... 


Rate this content
Log in