STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

3  

Nilesh Jadhav

Others

तू राधेच्या नावात आहे...

तू राधेच्या नावात आहे...

1 min
203

तुझ्या मनातही तेच 

जे माझ्या मनात आहे...

मी असेल कृष्ण तर मग 

तू राधेच्या नावात आहे...


विसरशील तू मला कदाचित

विसरणं तुझ्या अधिकारात आहे...

मी कसा विसरेल तुला..?

मी तर तुझ्या प्रेमात आहे...


मी नाही शोधणार कधी कुठे

तू मनाच्या गावात आहे...

रडेल कसा अश्रूंसोबत जाशील निघून

तू अखंड बुडालेली डोळ्यात आहे....


तुझ्या मनातही तेच 

जे माझ्या मनात आहे...

मी असेल कृष्ण तर मग 

तू राधेच्या नावात आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन