*" तू नव्या युगाची आशा
*" तू नव्या युगाची आशा
सभोवताली तुझ्या अनेक अडचनी
तरीही आहे तू नव्या युगाची आशा
विश्वात तुझी अगनित कार्ये
विवेक बुद्धीचा आत्म्यात वसा...
घे उंच भरारी गगनी आता
दिशेत भरावी नवी पताका
उद्यूक्त होवूनी उज्वलतेचा
नारी सन्मान राखण्या शिका...
संसारात करूनी सार्थ सेवा
मर्यादेच्या सिमा राखल्या
स्वंयसिद्धा ओळख देवूनी
हक्कानी सबळ जाहल्या...
सक्षंम होवूनी स्वबळावरती
नवनिर्मितीचे स्वप्न उराशी
निश्चयमेरूवर आरूढ होऊन
कर्तव्याची जुळवी गाठ मनाशी...
दाखवीली युक्तीने अन् शक्तीने
आपली चुनूक संसारपथावर
मनापासूनी करूनी निग्रह
रचली सु-गाथा या धरेवर....
