तू जवळ असताना
तू जवळ असताना
1 min
221
तू जवळ असतेस
तेव्हाच काहीतरी सुचते
अन् मी बसतो लिहीत
त्यावेळी तू नाराज होतीस
माझ्याकडे लक्ष नाही तुमचे
म्हणत रुसून बसतेस
मला ही सुचलेलं लगेच
लिहावंसं वाटतं
आता सुचलेलं नंतर
लक्षात नाही राहतं
आज जवळ नाहीस तू
भरपूर मोकळा वेळ आहे
पण वेड्या मनाला आता
काही सुचतच नाही
माझं काही लिहिणे होत नाही
तू रुसलीस तरी चालेल
माझ्याजवळ तू असावं
मला नवीन काही सुचावं
