STORYMIRROR

Prakash Chavhan

Others

4  

Prakash Chavhan

Others

तू चालत रहा

तू चालत रहा

1 min
593

तू चालत रहा 

चालण्यात दिसेल 

मिळेल तेथून काढत 

पाण्यासारखी वाट 


थांबलास तर संग्रहित होत 

वाफेत होऊन नभाला भेट

बोलवलं तर हाकेला ओ देत 

मेघातून मनसोक्त बरसून जा 


चालत राहा चालण्यात जिणं रें 

सामाहून अंतरी प्रेमात कुणा

वृक्षात कळी होऊन फुलत

फुलात पुन्हा बीज अंकुरित जा 


वाढत बहरून मौजेनं खेळत 

आनंदी सागरात पोहत 

वळणा वळणी अनुभूतीच घोट 

मनवा पिऊ पिऊन जा 


डावपेचात जीवन व्यस्थ होईल 

समाधानात मन रमवत रहा 

कारण सुख दडलंय खेळवृत्तीत 

चित्त तुझे शांत समाधानी ठेवून रहा 


Rate this content
Log in