तुळशी
तुळशी
1 min
439
माझ्या दारी आहे सुंदर तुळशी
कृष्णाची पत्नी आहे ती साजेशी
शोभा वाढविते माझ्या दाराची
नैवेद्यात असती पाने तिची
तिच्या सान्निध्यात राहण्यासाठी
प्रदक्षिणा मारते मी नित्यनियमासाठी
प्राणवायू मिळतो दिनराती
तुळशीची अशी ही महती
गळ्यात माळ असावी तुळशीची
रक्षण करी ती आरोग्याची
रोगराई नष्ट तिची पाने करती
घरोघरी तिची पूजा होती
अशी ही सुंदर तुळशी
सर्वांची आहे आपलीशी
