STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

तुळस माझ्या अंगणात

तुळस माझ्या अंगणात

1 min
335

तुळस माझ्या अंगणात

पाहा कशी हो फुलली

 पावित्र्य अन् आरोग्याचा 

वसा देते हो माऊली


हिरवी हिरवी पाने छान

भरभरूनी ऑक्सिजन

सौख्य सौभाग्याचे आम्हाला

तुळशी माय देई वाण


तिच्या सुदर मंजिऱ्या

 बहरला तो फुलोरा

 निघाली सर्व अर्पायाला

बघा सावळ्या सख्याला


साहित्याला गुण द्या
लॉग इन