STORYMIRROR

Sarika Musale

Others

4  

Sarika Musale

Others

तुला पाहते रे

तुला पाहते रे

1 min
153

प्रातःकाळच्या गर्द धुक्यांत सख्या

पर्णांवरच्या या दवबिंदूंत तुला पाहते रे


रविच्या आगमनाने धरती ही तेजाळली

या सोनेरी किरणांमध्ये तुला पाहते रे


नाद मंजूळ कोकिळेचा मनास छेडतो रे

स्वरांच्या त्या लयीत तुला पाहते रे


बेधुंदपणे बरसतात श्रावणसरी रे

नभीच्या इंद्रधनुत तुला पाहते रे


हृदयाच्या हर स्पंदनात तू वसतोस रे

माझ्याच प्रतिबिंबात तुला पाहते रे


राञी नभात चांदण्या चमकतात रे

पण पौर्णिमेच्या चंद्रात तुला पाहते रे


अंगणी मोहक रातराणी गंधाळली रे

जीवनसाथी तूच सख्या तुला पाहते रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन