तुझ्यातली निळाई...
तुझ्यातली निळाई...
रंग निळा... निष्ठा आणि आत्मविश्वासाचा
रंग निळा... शांती आणि सौम्यतेचा
रंग निळा... तणावमुक्तीचा
रंग निळा... सकारात्मक ऊर्जेचा.....
घेऊन आलीस सखे
क्षण ते सुखाचे
प्रेमाने रंग भरलेस
जीवनी सकारात्मकतेचे....
शांततेची निळाई
तुझ्या मुखकमलावर सदा विराजते,
नयनात तुझ्या नेहमी आत्मविश्वासाची झळाळी चमकते....
सौम्य तुझा स्वभाव,
लाघवी तुझं बोलणं
निळाईने खुलविले अधिकच
रुप तुझं देखणं...
सागरा सारखे अथांग
ह्रदय तुला लाभले
आभाळासम तुझ्या मनाने
इतरांचे दुःख जाणले....
आवाजाची तुझ्या मधूरता
त्याची मला नेहमीच असते अधीरता
नितळ, निर्मळ पाण्याप्रमाणे
आहे तुझी श्रेष्ठता....
निळे वस्त्र परिधान करून
श्याम रंगात एकरुप तू झाली
तुझ्या पवित्र सहवासाने
माझीही काया मोहरुन हरीनामात लीन झाली....
तुझाच ध्यास, तुझीच आस असते अंतरी,
मोरपिसागत हृदयाचा ठाव घेते
जशी घननिळ्याची बासुरी...
