STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तुझ्या विरहाने

तुझ्या विरहाने

1 min
348

तुझ्या विरहाने

केले गं वेडे मला 

अखंड भरलेल्या नयनांनी

दाटुन कंठ आला गं माझा


वेदनेने घायाळ झालेला मी

पूर्णपणे मी विरहात डूबलो

माझ्या कंठातून निघतो आहे

आर्त ध्वनीचा गं सुर


मन माझे गहिवरले गं वेडे

तुझ्यापासून आता नाही राहवत ग मला

ये लवकर नको सोडून जाऊस मला

नाही करमत गं मला

तुझ्यावाचून वेडा झालो गं राणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन