STORYMIRROR

अक्षता कुरडे

Others

3  

अक्षता कुरडे

Others

तुझ्या आठवणीत झुरतेय

तुझ्या आठवणीत झुरतेय

1 min
11.5K

येण्याचे तुझे लक्षण न दिसता,

घेतीय धाव तुझ्या ओढीनं..

निर्सगाला ओरडून साऱ्या,

सांगतेय पडलेय तुझ्या प्रेमात..


केव्हा येईल माझा प्रियकर,

घेऊन मजला जाईल दूरवर..

मन चातक होऊन राहतं नाही,

व्याकुळ होत उडतं सैरभर..


झाडे वेली फुले सांगत आहेत,

त्याला ही आहे तुझीच साथ..

तोही खूप आतुर असतो,

नेहमी येण्यास तुझ्या कुशीत... 


ऐकुन माझे भान हरपले,

अजुन नाही धीर धरवतं...

येऊन साऱ्या जगाला सांग ना,

किती तुझ हे मजवर प्रेम... 


तोडून सारी जगाची बंधन,

हेच माझे तुझ्यास समर्पण..

जाताना मजला घेऊन जाशील,

दूर होतील सारे दडपण...


Rate this content
Log in