STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

तुझं माझ नातं

तुझं माझ नातं

1 min
194

सगे सोयरेने जमवून दिलेलं 

आपल्या दोघांच नातं...

पूर्वी एकमेकांना पाहिलं नसलंही

तरीही बहरत गेलं मनात...


हळुहळु होत गेली ओळख 

मग करमेना तुजवीण मजवीण 

लग्न मुरजले एकदाचे अन्..

घट्ट होत गेली मनाची वीण...


एकमेकांना स्विकारले खरे..

वृक्षाला वेल बिलगली घट्ट 

फुलाचे फळ,फळाचे परागकण होताना...

नाती मात्र होत गेली घट्ट...


एकमेकांवर अवलंबून राहणं...

वयासोबत ओढही वाढली...

दुखणं खुपणं करता करता...

प्रेम जिव्हाळा आपुलकी काळजी आली...


एक जमवले गेलेले नाते खरे 

साचा जन्माचे आपण सोबती 

किती अजब नाते आपले..

आयुष्यभराचे पती आणि पत्नी...


Rate this content
Log in