Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शिल्पा म. वाघमारे

Others

2  

शिल्पा म. वाघमारे

Others

तुझीच.. ती

तुझीच.. ती

1 min
258


पहाटेपासून संसाराच्या काळजीत

काम काम कामच करते... 

जगत आहे कशीबशी 

क्षण तुझा नव्याने बहरत आहे ..


कधी आई होऊन कधी सहचारिणी

*ती* अविरत झटत राही. 

घरी गरम जेवण, आॅफिसात डबा

तुझा असलेला रुमालही ती कधी विसरत नाही.


मंडई, किराणा, अभ्यास मुलांचा

बाळाचं सारंकाही तीच पाहते आहे.. 

आला गेला पै पाहुण्याचं

सादर पाहुणचार करत 

उठत बसत दुखणी सारी अंगावरच काढत आहे.

ती राबते बाहेरही... तुझ्यासम

घरीही जीव तिचाच जातो

तरीही तू का तिच्याआधी

बिनधास्त तृप्तीचा ढेकर देतो... 


एक दिवस घरी ती नसताना

काय होतोय अवतार घराचा

तूच तुला शोधत असतोस घरभर

अन् सुटता सुटत नाही 

अनामिक गुंता हरवलेल्या मनाचा


ती अन्नपूर्णा, शारदा, लक्ष्मीही

ती आई होते आजारपणात तुझ्या

कधी... सखी प्रेमप्याले ओतणारी शय्येवरची मदना


तू कधी तरी समजून घे तिजला

'राहू दे' म्हणशील का?

माठातला पेलाभर पाणी

हातानेच घेशील का?


तिलाही विचार कशी आहेस?

हात ठेवून खांद्यावर...

कपाळी चुंबून हलके

बस म्हणशील का घटकाभर... 


अन् बघ मग क्षणांतच आभाळ तिचं भरुन जाईल..

'नको रे काम पडलीत' म्हणत... नव्या उमेदीने सुरु होईल...


सोप्पं असतं खूप सगळं

तू जाणीव फक्त सजीव हो

पेलते सारं आकाश तुझं ती

तू प्रेरणा तिची आजीव हो..


Rate this content
Log in