तुझीच मी होऊनी राहिले
तुझीच मी होऊनी राहिले
1 min
235
जीवनपुष्प माझे
तुलाच रे वाहिले
सखया तुझीच मी
होऊनी राहिले
आता न उरले
माझे मीपण
तव पायाशी
झाले अर्पण
तू दीप आणि मी
ज्योती होऊन राहिले १
तुलाच केले अर्ध्यदान मी
तुझ्या सुरांचे गीत आता मी
तू सूर छेडीता
मी नाद होऊनी राहीले
आज फुले ती
बहरूनी आली
अंगी अंगी रोमांच ल्याली
तू फुल होता
मी गंध होऊनी राहिले
सख्या तुझीच मी होऊनी राहिले
