"तुझी प्रीयतमा"
"तुझी प्रीयतमा"
1 min
269
मी तुझीच जन्मांतरीची प्रेमीका
किती काळ लोटला मी तुझी प्रीयतमा
प्रीयकरा आतूरले की मी मना
पुन्हा कश्यास घेवू मी वेदना..
जगले एकटे तुझ्यात भरले
सांजवातीला ही नाव तुजला
प्रेमाच्या वाटेवर किती अडथळे
दुरावाच जणू छळतो मजला..
श्वासा श्वासात स्मरते तुजला
वाहून गेले माझे मी पण
अश्रूने सुकल्या या पापण्या
नाही केले मी कोणतेच सण...
होईल व्याकुळ तुझी बावरी
जपते मी तुला क्षणोक्षणी
बघते सकाळ संध्याकाळी वाट
मी आहे तुझी प्रेम दिवाणी....
