STORYMIRROR

Karishma Dongare

Others

3  

Karishma Dongare

Others

तुझी- माझी मैत्री

तुझी- माझी मैत्री

1 min
219


आमच्या मैत्रीच्या प्रकाशाने

क्षितिजाला आज गाठले

सोबत थोडे आयुष्य जगून

आपलेसे मला वाटले.||१||


मनाच्या तारा जुळल्या

सहवास मधुर गोड

संगतीत तुझ्या फुलले मन

नेहमीचं भेटण्याची ओढ.||२||


तुझ्या मैत्रीने माझी

ओंजळ आहे भरलेली

तुझ्याच सोबतीने आज

वाट सुंदर फुललेली.||३||


कितीही अवघड वाटले

मैत्रीचं गणित सुटणार

असे एकच नाते म्हणजे

कधीचं नाहीं तुटणार.||४||


नात्याची सुंदर झ्यालर

आपण दोघींनी विणलेली

प्रेमाने , मायेने भरलेली

मऊ- मऊ पंख असलेली.||५||


हजारो भांडणे करून

सांत्वणाने कशी विणलेली

मनवनारी, समजवनारी

समजुन घेऊन उमललेली.||६||


Rate this content
Log in