STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

तुझी माझी जोडी जमली ग गावातून

तुझी माझी जोडी जमली ग गावातून

2 mins
407

तुझी माझी जोडी जमली ग गावातून मला हाकलून दिलं ग

तु जीवाचं रान करून प्रेम माझ्यावर केलं ग

तुला माझ्या सोबत जाताना पाहिलं ग

गावातल्या पोरांनी बोटं तोंडात घातली ग.....


आपण दोघ कॉलेजमधून पळून जाऊ ना

माझा बाप तुला बघत येईल ना.

आपल्या दोघांच्या घरचे कॉलेजात चौकशी करतील ना.

उद्या आपण फिरायला जाऊ ना.

दोघांच्या घरी आपल्या प्रेमावर जळणारी तुझे जिवलग मित्र सांगतील ना.....


तुझी माझी गट्टी जमली ग गावातून मला हाकलून दिलं ग

तु जीवाचं रान करून प्रेम माझ्यावर केलं ग

तुला माझ्या सोबत जाताना पाहिलं ग

गावात चर्चा रंगली ग.....


आपण दोघ फिचर ला जाऊ ना

माझ्या पाळतीव होणारा तुझा मेव्हणा बसलाय ना

मंग तु स्क्राफ तोंडाला बांधुन ये ना

तू घातलेला गॉगल ओळखू नाहीं यायचा ना

मी लाल रंगाचा फ्राक तुझ्या सासूला भडक दिसलं ना....


तुझी माझी जोडी जमली ग गावातून मला हाकलून दिलं ग

तु जीवाचं रान करून प्रेम माझ्यावर केलं ग

तुला माझ्या सोबत जाताना पाहिलं ग

तुझ्या मैत्रीनीला डोळ्यात आग झाली ग.

तुझ्या मैत्रिणीला चिंच कडु लागली ग.....


आपण आईस्क्रीम खायला जाऊ ना

तिथं तुझ्या बाप्पाचा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल ना

उदया तुझ्या सासऱ्यानी पोलिसांत तक्रार दिली ना

 आपल्या दोघांत शोधाशोध सुरू होईल ना...

 आपलं प्रेम कोर्टात जाईल ना....


तुझी माझी जोडी जमली ग गावातून मला हाकलून दिलं ग

तु जीवाचं रान करून प्रेम माझ्यावर केलं ग

तुला माझ्या सोबत जाताना पाहिलं ग

आपलं स्वप्नं भंगल ग चारचौघात मैत्रीनीने केलं ग

जिच्यावर विश्वास ठेवला तिनंच वाटुळ केलं ग....


आपलं भेटणं संपुष्टात आल ना

तुझ्यापासून वेगळं झालं ना

तुझ्या मूळ माझं नाक कापलं ना

तुझ्यामूळ मला आतां कोंडुन ठेवलं ना .......


तुझी माझी जोडी जमली ग गावातून मला हाकलून दिलं ग

आज नाहीं तर उद्या वातावरण शांत झालं की पुन्हा मी

तुझ्या कडे येणार ग तुला सर्वासमोर मागणी घालणार ग

शेवटी तुझ्याशी लग्न करणार ग....!


माझ्या सासूला खरंच आनंद झाला ग....

माझ्या सासऱ्यानी बुलेट घेऊन दिली ग

तुमचा जावई इन्कम टेक्स ऑफिसर आहे ग....

आधी पासून सेटिंग कामाला आली ग

वायफाय ची रेंज फास्ट होती ग...

म्हणून पुढची पिडी फाईव्ह जी आहे ग

आता चार चाकी सिक्स जी येतंय ग

मंदी कुठं आली ग ....


सगळीकंड अफवा पसरली ग

आय फ़ोन इलेव्हन आलंय ग

आपला सेल्फी पहिला काढुंन घे ग...

खरंच दिवाळी दसरा जोरात करु ग

मामा मामीला कपडे घेऊ ग

मटण खायला घालू ग

सारख येन जाण चालु राहूं दे ग

मेव्हन्याला कामाला सरकारी लावू ग

आता ऑनलाईन परीक्षा झाली ग

वशीला बंद झाला ग..

का तर आता मोदी सरकार आहे ग....


Rate this content
Log in