Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

तुझी माझी भेट होईल

तुझी माझी भेट होईल

3 mins
871


कधी आणि कुठेतरी 

तुझी माझी भेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||0||


आठवणी उजळतील तसे 

अश्रूही नयनी गळतील 

माझ्या दिशेने सखे तेंव्हा 

पाऊले तुझी वळतील 

भले आपली भेट सखे 

थोडीशी लेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||1||


विचारीन तुला तेंव्हा मी 

तू खूष आहेस ना 

गतकाळातील आठवणीत  

तू कधी जातेस का 

क्षणार्धाची असेल तरी 

भेट ती ग्रेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||2||


इतक्या कालावधी नंतर 

विचार तू करशीलंच 

हट्ट तुटेल तुझा अन 

थोडीशी हरशीलंच 

माझ्याप्रती नक्कीच तुझा 

कमी तेंव्हा हेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||3||


आठवेल तुला प्रेम वेडं 

तूझ्यावर मी केलेलं 

लाथाडलंस ज्याला तू 

मेंदूत तूझ्या गेलेलं 

वेळ लागेल थोडा त्याला 

अजून थोडा वेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||4||


तुलाही माझी ओढ असेल

हृदय माझं नाव घेईल 

फक्त माझ्या आठवणीत 

तुला ते अलगद नेईल 

तुझं आणि माझं नातं 

सखे तेंव्हा सेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||5||


प्रेम जागेल मनात तूझ्या 

वाट तू माझी बघशील 

केवळ माझ्या आठवणीत 

आयुष्य मग तू जगशील 

ओढ लागेल तुला माझी 

प्रेम मनी जनरेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||6||


शोधशील सर्वत्र मला 

माझंच नाव तू जपशील 

कशी माझ्या प्रेमापासून 

अगं वेडे तू लपशील 

या दुनियेत एक मीच 

बघ तुझा फेव्हरेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||7||


खंत मनी असेलं तूझ्या 

हृदय माझं तोडल्याची 

हृदयावरून स्वतःच्या 

प्रीत माझी खोडल्याची 

नक्की तूझ्या हृदयाचा 

ओपन बघ गेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||8||


दिवसरात्र माझंच तू 

मग नाव मुखी घेशील 

चांदण्याच्या पाऊलाने 

दुनियेत माझ्या येशील 

माझ्याप्रती आकर्षण 

मनी तूझ्या क्रिएट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||9||


मिलन तुझं माझं होईल 

मिठीत घट्ट घेईन तुला 

विसरू शकणार नाही असं 

एक जग देईन तुला 

बघशील तू प्रेम जागून 

मी तुझा सोलमेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||10||


हृदयाला पाझर फुटून 

संवेदना ही जाणवतील 

नजर मिळता नजरेशी 

नयन तुझे पाणवतील 

प्रेमाच्या या ओलाव्याने 

हृदय तुझं व्हायब्रेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||11||


भेट तुझी माझी होता 

आसमंत ही खुलेल बघ 

प्रेम माझे हृदयी तूझ्या 

हळुवार मग फुलेल बघ 

प्रेमाचा तो दिवस सखे 

रोमँटिक डेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||12||


थोडी वेडी होशील प्रेमात 

थोडा हरवून मी जाईन 

कशी जपावी प्रीत आपली 

काही ठरवून मी जाईन 

पागल प्रेमी नाव आपले 

आता अप्रोप्रिएट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||13||


प्रारब्धातही नाव तुझे 

मी बघ समाविष्ट करीन 

तुझा होण्याचे जन्मोजन्मी 

एकच उद्दिष्ट धरीन 

मिलन होता सखे आपले 

फेव्हरेबल फेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||14||


तूझ्या मनातील ओढीला 

वाट मोकळी होईल 

हृदयी तूझ्या बघ प्रीतीची 

खुली पोकळी होईल 

भावना मनातील आता 

बघ कम्युनिकेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||15||


साथ देईल विश्वच अवघं

अनिष्ट सारं गळेल बघ 

बहरेल हे जीवन आपले 

तुलाही ते कळेल बघ 

जीवनी आपल्या युगायुगाचे  

प्रेम पार्टीसिपेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||16||


इतकं रुसणं तुझं खरंच 

जीवघेणं होतं ग 

मन तुझं जिंकण्यासाठी 

परीक्षा देणं होतं ग 

आता तूझ्या मनाशी 

माझं मन रिलेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||17||


आठवण तर तुलाही 

माझी कधी येईल बघ 

कोणीतरी अवतीभवती 

माझं नाव घेईल बघ 

तूझ्याकडून माझं प्रेम 

नक्की ऍप्रिशिएट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||18||


एक एक शब्द तुझा 

टोचलाय माझ्या मनाला 

अधीर आहे तरीही 

तूझ्या आपलेपणाला 

तूझ्या माझ्या प्रेमाची 

कहाणी अपडेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||19||


दिशा आणि दशा माझ्या 

प्रेमाची बदलेल ग 

तुलाही महत्व माझ्या 

प्रेमाचं कळेल ग 

राग तुझा निवळून आपली 

कहाणी रोटेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||20||


प्रवाहात जीवनाच्या 

कितीजण येतात  

मोजकेच त्यातील 

हृदयाचा ठाव घेतात 

प्रेमाच्या दुनियेत आपलं 

जग लोकेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||21||


प्रेमाने तूझ्या माझ्या 

अर्थ लाभेल जीवनाला 

युगायुगाचा विसावा 

मिळेल वेड्या मनाला 

विश्व आपल्या दोघांचं 

आता डायलेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||22||


नयन तूझ्या हृदयाची 

भाषा आता बोलतील 

गुपितं मनातली 

अलगद खोलतील 

पापण्यांच्या हालचालीने 

प्रेम इंडिकेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||23||


मागणं त्या निर्मिकाशी 

मी आता मागत आहे 

प्रेम माझ्यासाठी तूझ्या 

हृदयी जागत आहे 

नातं आपलं बघत जा 

अजून इनोव्हेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||24||


दोन जीव एकमेकांशिवाय 

राहू शकत नाही 

दु:खात एकमेकांना 

मुळीच पाहू शकत नाही 

नातं हे जन्मोजन्मीचं 

अजून इंटिमेट होईल 

कुणाकरवी न होता 

भेट ती थेट होईल ||25||


Rate this content
Log in