तुझे हात माझ्या हाती"
तुझे हात माझ्या हाती"
दे तुझे हात माझ्या हाती
मग होतील मिळुन चार
गुंफली मी प्रितीची कडी
ओवायचे त्यात प्रेमाची धार..
मुक्त कुंतले खुले केले
नजरेतला तू माझा कैदी
तुला गुपित सांगते आज
तू ना माझ्या हातावरची मैंदी..
कैसी गुंतली केसात ही
तुझ्या नावाची जाई-चमेली
माझ्या ओठावरती चढली
ही आगळीच आहे लाली...
पहतोस का जरा मजकडे
माझे मधाळ लावण्य झरे
प्रणयराधन हास्य पाहुनिया
वेडावती तुझे नयन शरे...
सख्या तुझ्या मुखावरचे
समाधान ही मीच आहे
ह्रदयात घेते भरून तुला
तुच माझा प्राणनाथ आहे....
