STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

तुझा छंद

तुझा छंद

1 min
401

कळत नाही मनाला 

कसा करावा छंद

जीव वेडावला सखे

नको मजला सुगंध


तुझ्या सहवासात

मी शोधला छंद

तुझे स्मितहास्य

फुलातला मकरंद


तुला पाहण्याचा

लागला होता छंद

तुझे मधुर बोल

जसे गोड करवंद


गेलीस दूर निघून

जडला कवितेचा छंद

विरहात असो यातना

मिळतो शब्दाने आनंद


Rate this content
Log in